इंदापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दोन मॅगझिनसह आरोपी जेरबंद
सुमारे ₹58 हजारांचा मुद्देमाल जप्त

इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन असा सुमारे ₹58 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.इंदापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून अवैध गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश केंकाणे, पोलीस अंमलदार विनोद लोखंडे, सागर शिरसागर, अंकुश माने, राहुल शिंदे, योगेश कर्दे, रसोर पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत असून, अवैध शस्त्रांविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



