Uncategorized

बिजवडी पंचायत समिती गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर पाटील यांची प्रचारात आघाडी.

शिवसेनेची मशाल गंगावळण मधून पेटणार..

  • इंदापूर:-इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांनी चांगलाच रंग धरला असून बिजवडी पंचायत समिती गणात सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. सुरुवातीला ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी सरळ लढत असल्याचे चित्र होते. मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही मशाल या चिन्हावर आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याने ही लढत त्रिकोणी होत चालली आहे.
    बिजवडी पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसत आहे. सुधीर पाटील हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रचारात वेगळीच धार निर्माण केली आहे. “सामान्य जनतेचे प्रश्न, स्थानिक विकास आणि पारदर्शक कारभार” हे मुद्दे मांडत ते मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसते.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांचे उमेदवारही जोरदार प्रचार करत असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एन्ट्रीमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मशाल या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराला मतदार कितपत साथ देतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
    या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे नेमका कोणत्या पक्षाला फटका बसेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी बिजवडी पंचायत समिती गणात शिवसेनेचे सुधीर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे आणि निवडणुकीत चुरस वाढवल्याचे चित्र दिसून येत आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे आता संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close