शिवकृपा सोसायटीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय; ११ विरुद्ध २ ने स्वाभिमानी पॅनल पराभूत.
युवकांच्या एकजुटीतून उभा राहिला विजयाचा गड!

📍 इंदापूर तालुका | प्रतिनिधी: शिवकृपा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत राजकीय दिग्गजांना मोठा धक्का दिला. या निवडणुकीत शिवकृपा शेतकरी विकास पॅनल आणि शिवकृपा स्वाभिमानी विकास पॅनल यांच्यात थेट लढत झाली होती.
सदरची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक मतदार बंधूंनी प्रयत्न केले होते, मात्र त्याला यश आले नाही. स्वाभिमानी विकास पॅनलकडून विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला जात असताना, शेतकरी विकास पॅनलने एकजूट आणि मतदारांचा विश्वास यांच्या जोरावर निवडणुकीत बाजी मारली.
शेतकरी विकास पॅनलमधील सर्व उमेदवार हे प्रत्यक्ष शेतकरी असल्याने त्यांनी एकमेकांच्या अडीअडचणींना साथ देत प्रचार केला. या पॅनलचे नेतृत्व युवा, तडफदार आणि सर्वांना आपलेसे करणारे महेंद्र भाऊ जगताप यांनी केले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी पॅनलला भरघोस पाठिंबा दिला.
निकालात शेतकरी विकास पॅनलने ११ विरुद्ध २ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत स्वाभिमानी पॅनलचा पराभव केला. या विजयामुळे मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरला आहे.
निवडणुकीनंतर सर्वानुमते महेंद्र भाऊ जगताप यांचे वडील श्री. नानासाहेब जगताप पाटील यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक खारतोडे महाराज यांची निवड झाली.
या यशाबद्दल सर्व विजयी उमेदवारांनी मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
🔴शिवकृपा शेतकरी पॅनलचे विजय झालेले उमेदवार
१)अरविंद नामदेव जगताप
२)सतीश महादेव जगताप
३)नानासो मारुती जगताप
४)देवराव नारायण जगताप
५)रामकृष्ण यादवराव जगताप
६)विठ्ठल श्रीरंग ताटे
७)नानासाहेब शिवराम कदम
८)गोरख दशरथ कुंभार
९)बाबासो आन्याबा खारतोडे
महिला प्रतिनिधी
१०)छाया बाळासाहेब जगताप
११)सुनिता महादेव गिरमकर
🔴शिवकृपा स्वाभिमानी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार
१)महादेव दादासाहेब आढाव
२)अजित जालिंदर जगताप



